‘वकील बदल नाहीतर….’ एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धमकावल्याचा दीपिकाच्या मॅनेजरचा आरोप

अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाश(karishma prakash said ncb officers thretening her) हिने आपल्यावर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. आपला वकील बदल, अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू, असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले आहे. मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला आहे.

    मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी एनसीबीच्या रडारवर असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाश(karishma prakash said ncb officers thretening her) हिने आपल्यावर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. आपला वकील बदल, अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू, असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले आहे. मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला आहे.

    एनसीबीने यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती दिली. करिष्माविरोधात कठोर कलम लावण्याचे पहिल्यापासून ठरले होते, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. करिष्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी करिष्मा प्रकाश हिच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीला सामोरे जावे लागले होते.