दीपिका पदुकोणचा फायटर लूक आला समोर, स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडची साकारणार भूमिका!

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी 2024 रोजी 'फाइटर' रिलीज होत आहे.

  मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepik Padukon) यांच्या फायटर (Fighter) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यशराज फिल्म्सचा हा चित्रपट भारतातील पहिला आणि सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट आहे. ज्यामध्ये हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोणही जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर आला आहे ज्यामध्ये ती एका स्क्वाड्रन लीडरच्या भूमिकेत दिसत आहे.

  दीपिका पदुकोण ‘फायटर’मध्ये स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारणार आहे. तिच्या कॉल साइन ‘मिनी’ द्वारे देखील ओळखले जाते. एअर ड्रॅगन युनिटमधील स्क्वाड्रन पायलटची त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडणार आहे. हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे हे पहिले ‘मिशन’ आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  या चित्रपटात दीपिका पहिल्यांदाच हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. पठाण फेम सिद्धार्थ आनंदने याचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये हृतिक आणि दीपिकासोबत अनिल कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांपासून ते हृतिक रोशनच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी 2024 रोजी ‘फाइटर’ रिलीज होत आहे.