दीपवीरच्या 119 कोटींच्या ड्रीम होमची बॉलिवूड विश्वात जोरदार चर्चा…..दीपवीर ‘या’ सुपरस्टारचे होणार शेजारी

बॉलिवूड सुपस्टार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या ड्रीम होमची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. कुठे आहे ड्रीम होम? कसं असेल ड्रीम होम? किती कोटींना विकत घेतलं हे ड्रीम होम? दीपवीरचा शेजारी कोण? जाणून घ्या सविस्तर...

  दीपवीर (deepveer) बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल…सिनेमात या दोघांचं बॉन्डींग सर्वांना परिचित आहे…पण, पर्सनल लाईफमध्येही ते एकमेकांच्या प्रेमात आखंठ बुडालेले असतात. ऑनस्क्रीन दीपिका आणि रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला ऑफस्क्रीनही त्यांचं छान बाँडिंग आहे. अलीकडेच या कपलने मुंबईत 119 कोटींचे अलिशान घर खरेदी केले आहे. हे दीप-वीरचे ‘ड्रिम हाऊस’ असल्याचे म्हटले जात आहे. आता या ‘ड्रीम हाऊस’चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

   

  ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिका-रणवीरच्या ‘ड्रीम हाऊस’चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका-रणवीरचे ‘ड्रीम हाऊस’ तुम्ही पाहू शकता. सध्या या अलिशान घरामध्ये दीपिका आणि रणवीर राहत नसून इमारतीचे अद्याप काम सुरू आहे.

  शाहरुखचे नवे शेजारी दीपवीर

  दीपवीरचे हे ‘ड्रीम हाऊस’ समुद्राच्या अगदी जवळ आहे. ‘द इकोनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील 16,17,18 आणि 19 मजले 119 कोटींना दीपिका-रणवीरने खरेदी केले आहेत. हे त्यांचे ‘ड्रीम हाऊस’ आहे. काही दिवसांपूर्वी दीपवीरने कन्स्ट्रक्शन पाहण्यासाठी गेले होते.

  रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर व आलिया भट्टची जोडी पाहायला मिळणार आहे. तर दीपिका लवकरच ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तिचा ‘फायटर’ चित्रपट २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.