दीपिका पोहोचली रुग्णालयात, हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना घडले असे काही…

दीपिका पादुकोण सध्या हैदराबादमध्ये तिच्या पुढील चित्रपट प्रोजेक्ट केचे शूटिंग करत असल्याचे वृत्त आहे. मात्र शूटिंगदरम्यान तिची तब्येत बिघडल्याने तिने तातडीने हॉस्पिटल गाठले.

    बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, शूटिंगदरम्यान दीपिकाची तब्येत बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ती हैदराबादमध्ये अभिनेता प्रभाससोबत चित्रपटाची शूटिंग करत आहे.

    हृदयाचे ठोके वाढल्यानंतर रुग्णालयात पोहोचली

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणला हृदयाचे ठोके वाढण्याची तक्रार होऊ लागली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती हैदराबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये पोहोचली जिथे तिची तपासणी करण्यात आली. आता ती हॉटेलमध्ये आराम करत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे बोलले जात आहे.

    दीपिकाचे हे आगामी सिनेमे आहेत

    दीपिका आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. प्रोजेक्ट केमध्ये ती प्रभाससोबत, फायटरमध्ये हृतिक रोशन आणि पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे, तर तिने याआधी शाहरुख खानसोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख आणि दीपिकाचा हा एकत्र चौथा चित्रपट असेल. दीपिका आणि शाहरुख खान या दोघांनीही या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.