चर्चा तर होणारच! दीपिकाच्या चार कोटी ४८ लाख रूपयाच्या नेकलेसची

दीपिकाने तेथील भारतीय पॅव्हेलियनमध्ये लोकांना संबोधित करताना सांगितले की, 'एक दिवस कान्स भारतात येईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांची प्रतिष्ठा मोठी होईल.'

  बॅलिवू़डची डिंपल गर्ल दीपिका सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेली आहे. या फेस्टिव्हलची ती ज्यूरी मेंबर आहे. नुकताच तिचा तिथला एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या सुट मध्ये खूप क्लासी दिसत आहे. मात्र, तिच्या ड्रेस आणि लूकपेक्षा तिच्या नेकलेसची जास्त चर्चा रंगली आहे.

  उकृष्ट अभिनय आणि सौंदर्याच मिलाफ असलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्तेत आहे. फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी तिनं नुकताच एक नवा लूक केला होता. त्यावर तिने घातलेल्या नेकलेसने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिकाच्या नेकलेसची किंमत चार कोटी ४८ लाख रूपये आहे. हा नेकलेस १८ कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केला आहे. हे सर्व मिळून हा नेकलेस १९.०५ कॅरेटचा आहे. दीपिकानं शेअर केलेल्या खास फोटोमध्ये हा नेकलेस दिसत आहे. दीपिकाने तेथील भारतीय पॅव्हेलियनमध्ये लोकांना संबोधित करताना सांगितले की, ‘एक दिवस कान्स भारतात येईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांची प्रतिष्ठा मोठी होईल.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)