शेफ कुणाल कपूरचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर, पत्नीला त्रासाला कंटाळून कोर्टात केला होता अर्ज!

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने मंगळवारी सेलिब्रिटी शेफला घटस्फोट मंजूर केला.

  गेल्या काही दिवसात मनोरंजन क्षेत्रातुन सेलेब्रिटींसंदर्भात अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. काही सेलेब्रिटी लग्नबंधनात अडकत आहते. कुणी आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करत आहेत तर कुणी आहे त्या नात्यातुन बाहेर पडत आहेत. काही दिवसापुर्वी महाभारत फेम प्रसिद्ध अभिनेता नितीश भारद्वाजने पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. तर आता पुन्हा एका सेलेब्रिटी त्याच वाटेनं जातान दिसत आहे. सेलेब्रिटि शेफ कुणाल कपूर सध्या चर्चेत आहे. कुणाल कपूरही त्याच्या पत्नीपासून विभक्त होणार आहे. नुकतचं दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला पत्नीने केलेल्या ‘क्रूरते’च्या कारणावरून घटस्फोट मंजूर (Chef Kunal Kapur Divorce) केला आहे. न्यायालयाने सांगितले की, महिलेची त्याच्यासोबतची वागणूक सन्मानजनक नाही. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या कुणालने ही याचिका दाखल केली होती, त्यात त्याला यश मिळालं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

  कुणाल कपूरचा घटस्फोट मंजूर

  न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने मंगळवारी सेलिब्रिटी शेफला घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने म्हटले आहे की, कायद्यात हे स्पष्ट आहे की सार्वजनिक ठिकाणी पती / पत्नीवर निष्काळजी, अपमानास्पद आणि निराधार आरोप करणे ‘क्रूरता’ आहे. कोर्टाने म्हटले आहे की, “जेव्हा एका जोडीदाराचा दुस-याबद्दल असा स्वभाव असतो, तेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा अपमान होतो आणि अशा परिस्थितीत दोघांना एकत्र राहण्यास भाग पाडण्याचं कोणतंही संभाव्य कारण अस्तित्वात नाही.”

  कुणाल कपूरनं पत्नीवर केलेत हे आरोप

  कुणाल कपूरचे 2008 साली लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या पत्नीने 2012 मध्ये मुलाला जन्म दिला. कुणालने  याचिकेत आरोप केला होता की, त्याच्या पत्नीने वारंवार पोलिसांना फोन करून सोशल मीडियावर आपल्याविरुद्ध अफवा पसरवण्याची धमकी दिली होती. याशिवाय त्याच्या पत्नीने कधीच आई-वडिलांचा आदर केला नाही. सेलिब्रिटी शेफने असाही दावा केला आहे की जेव्हा ते 2016 मध्ये मास्टरशेफ इंडिया शोचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या मुलासह स्टुडिओमध्ये घुसली होती आणि गोंधळ घातला होता.

  तर, कुणालच्या पत्नीने न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी तिच्यावर खोटे आरोप केल्याचा दावा केला आहे. तिने म्हण्लटं की ती नेहमी तिच्या पतीशी चांगली वागत होती आणि त्याच्याशी एकनिष्ठ होती. कुणालने तिला अंधारात ठेवले आणि घटस्फोट घेण्यासाठी खोट्या कथा रचल्याचा आरोप तिने केला आहे.