रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू, दिल्ली पोलिसांकडून चार जणांची चौकशी!

पोलिसांनी ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून रश्मिकाचा अपलोड करण्यात आला होता त्या आयपी अ‍ॅड्रेसवरून पोलिसांना या संशयितांची माहिती मिळाली होती. आता या प्रकरणी चार जणांची चौकशी करण्यात येत आहे.

    काही दिवसांपुर्वी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डिपफेक व्हिडिओ (Rashmika Mandana Deepfake video)  इंटरनेटवर व्हायरल झाला होता. हा बोल्ड व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटिंनीही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रश्मिकाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आत नवीन अपडेट समोर आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दिल्ली पोलिसांनी ४ संशयितांची चौकशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात महत्त्वाचे मुद्दे सापडले असून तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांची पडताळणी केली जात आहे.

    नेमकं काय प्रकरण

    काही दिवसापुर्वी रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आली होती. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओ रश्मिका असल्याचं दिसत होतं. काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये ती लिफ्टच्या आत आल्याचे दिसत होतं. मात्र, या व्हिडिओमध्ये रश्मिका नसून झारा पटेल नावाच्या मुलगी असल्याचं नंतर समोर आलं होतं. या घटनेवरुन सिनेसृष्टीत चांगलीच बरीच खळबळ उडाली होती. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान  रश्मिकाच्या अभिनेत्रीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    दिल्ली पोलिसांनी तपास पुढे नेत काही जणांची चौकशी केली होती. पोलिसांनी ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून रश्मिकाचा अपलोड करण्यात आला होता त्या आयपी अ‍ॅड्रेसवरून  पोलिसांना या संशयितांची माहिती मिळाली. आता दिल्ली पोलिसांचे सायबर तज्ज्ञ या पोस्टमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.