‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या धमाकेदार गाणं रिलीज,  डिलिव्हरी ‘भाऊचा नादखुळा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे.