कपिलच्या शोमध्ये येणार देओल ब्रदर्स, वाईट दिवस आठवून सनी झाला भावूक

देओल बंधू आता नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

    द ग्रेट इंडियन कपिल शो : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा कपिल शर्माचा (Kapil Sharma) ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक नवीन पाहुणे आले होते. या शोचे चार भाग झाले आहेत आणि या चारही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 2023 हे वर्ष देओल कुटुंबाच्या नावावर होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये धर्मेंद्रने खळबळ माजवली, तर सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. यानंतर बॉबी देओलने (Bobby Deol) ‘ॲनिमल’मधील अबरारच्या भूमिकेने सर्वांची लाइमलाइट चोरली. देओल बंधू आता नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

    या शोचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे आणि या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शित झालेल्या भागात कपिल शर्मा आणि त्याची टीम सनी आणि बॉबीसोबत खूप मजा करताना दिसत आहे. यादरम्यान सनी आणि बॉबीही भावूक होताना सुद्धा दिसले आहेत. यावेळी बॉबी देओलने सांगितले आणि त्यामुळे ते ऐकून बॉबी देओल भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले.

    काय म्हणाला सनी देओल?
    सनी देओल म्हणाला की, “ते 1960 पासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत आणि अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते पण काही गोष्टी घडत नव्हत्या. माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यानंतर ‘गदर’ आला, त्याआधी माझ्या वडिलांचा चित्रपट आला यावर विश्वासच बसत नव्हता! त्यानंतर ऍनिमल चित्रपट आला आणि आम्हाला विश्वासच बसत नव्हता, हे ऐकून बॉबी देओलच्या डोळ्यात अश्रू आले.

    शोमध्ये देओल ब्रदर्स देखील खूप हसताना दिसणार आहेत. यावेळी कृष्णा अभिषेक ॲनिमलमध्ये बॉबीच्या अबरारच्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याच वेळी, प्रेक्षकांना सनी देओल आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील मजेदार क्षणांची झलक पहायला मिळेल, ज्यामध्ये ग्रोव्हर इंजिनियर चुंबक मित्तलची भूमिका साकारताना दिसणार आहे.