‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘देवा देवा’ गाणं रिलीज, पहा रणबीर कपूर आणि आलिया भट्टची अशी झलक

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'देवा देवा' हे नवीन गाणं रिलीज झालंय. या गाण्यात अभिनेता आगीच्या बॉलशी खेळताना दिसत आहे. त्याचवेळी त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्टही व्हिडिओमध्ये दिसतीये. अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटातील 'देवा देवा' हे गाणं अरिजित सिंग आणि जोनिथा गांधी यांनी गायल आहे. प्रीतमने संगीत दिलं असून अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिलेत. हे गाणं सोनी म्युझिक इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केल जातयं.