‘टिव्हीच्या पार्वतीला मिळाले तिचे शिव, अभिनेत्री सोनारिका भदोरियानं विकास पराशरसोबत बांधली लग्नगाठ!

सोनारिका भदोरिया वेडिंग टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरियाने तिच्या आयुष्यातील प्रेम विकास पराशरसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केलं.

  सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन चालू आहे. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारंनी लग्नगाठ बांधली. अभिनेत अरबाज खानने गर्लफ्रेंड शुरा खान सोबत लग्न केलं. तर आता अभिनेत्री रकुल प्रित सिंग आणि जॅकी भगनानीही लग्नबंधनात अडकणार आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरील कलाकारांनी लग्न करुन त्यांच्या नव्या आयुष्याची इंनिग सुरू केली. टीव्हीची पार्वती म्हणजे ‘देवों के देव…महादेव’ मालिकेतील अभिनेत्री ​​सोनारिका भदौरियाने (Sonarika Bhadoria Wedding)तिचा खऱ्या आयुष्यातला ‘महादेव’ विकास पाराशरसोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नाची झलक सोशल मीडियावर समोर आली आहे.

  सोनारिका भदौरियानं केलं लग्न

  सोनारिका भदौरियाने तिच्या लॅांग टाईम बॉयफ्रेंड विकास पाराशरसोबत लग्न केले. मागच्या वर्षी मे महिन्यात, विकासने त्याची प्रेमिका सोनारिकाला समुद्रकिनारी लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी डिसेंबर 2022 मध्ये रितीरिवाजानुसार एंगेजमेंट केली होती. आता अखेर दोघे पती-पत्नी बनले आहेत. दोघांनी राजस्थानातील रणथंबोर येथे शाही पद्धतीने लग्न केलं.

  सोनारिका भदौरिया आणि विकास पराशर यांनी एका भव्य सेटअपमध्ये गाठ बांधली. नवविवाहित जोडप्याच्या भव्य वर्माला समारंभाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू सोनारिका भावूक झालेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वराचा राजा विकास लाल लेहेंगा घातलेल्या सोनारिकाचा दुपट्टा उचलतो आणि मग त्यांचे डोळे पाणावले. सोनारिका आपल्या पतीकडे पाहून भावूक झाली आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला.

  सोनारिकाचा वेडिंग लुक चर्चेत

  सोनारिका आणि विकासच्या वेडिंग लूकबद्दल बोलायचं झालं तर दोघंही आपापल्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होतं. सोनारिकानं गोल्डन आणि सिल्व्हर डिटेलिंग असलेला स्कार्लेट हेवी एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा परिधान केला होता. तसेच, हिऱ्यांच्या दागिने घातले होता. ग्लॉसी मेकअप आणि हेअरबनसह सोनारिकाने तिचा ब्राईडल लूक पुर्ण केला होता. तर, वर विकास पराशरने बेज रंगाच्या शेरवानीने मध्ये खूप छान दिसत होता. या दोघांनाही फॅन्ससह सेलेब्रेटिनींही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.