dhanush

धनुषला ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये(Dhanush Wins Best Actor Award In Bricks Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘असुरन’(Asuran) या तमिळ चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

    दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने(Dhanush Wins Award) त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.अनेक चांगल्या भूमिकाही केल्या आहेत. नुकतंच धनुषला ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये(Dhanush Wins Best Actor Award In Bricks Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘असुरन’(Asuran) या तमिळ चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते वेत्रीमारन यांनी केले आहे. या चित्रपटात धनुषचा डबल रोल आहे.

    महत्त्वाचे म्हणजे धनुषला याआधी याच चित्रपटातील अभिनयासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. नुकतंच ५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) रविवारी पार पडला.

    असुरन हा चित्रपट ४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. असुरन हा चित्रपट वास्तविक जीवनातील १९६८ मधील किल्वेनमनी हत्याकांडापासून प्रेरित आहे. या चित्रपटातील धनुषच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. ‘असुरन’ या चित्रपटात धनुषने शिवस्वामी नावाच्या शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. त्याची पत्नी पचयम्माची भूमिका अभिनेत्री मंजू वारियरने साकारली आहे.