समाजासाठी स्वतःला वाहून घेणारा व प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास भाग पाडणारा “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे”

अभिनेता प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयातून आनंद दिघे जिवंत केले आहेत. प्रसाद ओकच्या अभिनयामुळे आनंद दिघे किती महान, त्यांचे काम आणि माणुस म्हणून दिघे साहेब कसे होते हे कळते. आणि प्रेक्षागृहातून बाहेर पडल्यावर प्रसाद ओक असे म्हटल्यावर आनंद दिघे यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभे राहते. व मुखावाटे आपसुकपणे ‘क्या बात है’...हे उदगार बाहेर पडतात.

    मुंबई : निर्माता मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा सिनेमा शुक्रवारी राज्यभरात प्रदर्शित झाला. धर्मवीर हा सिनेमा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असल्याने लोकांना याची अनेक दिवसांपासून हा सिनेमा कसा असेल याची उत्सुकता होती. संपूर्ण सिनेमात आठवणीतून प्रसंग दाखवत सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास भाग पाडतो. आणि आनंद दिघे साहेबांनी किती मोठं काम आहे याची प्रचिती येते. अभिनेता प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयातून आनंद दिघे जिवंत केले आहेत. प्रसाद ओकच्या अभिनयामुळे आनंद दिघे किती महान, त्यांचे काम आणि माणुस म्हणून दिघे साहेब कसे होते हे कळते. आणि प्रेक्षागृहातून बाहेर पडल्यावर प्रसाद ओक असे म्हटल्यावर आनंद दिघे यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभे राहते. व मुखावाटे आपसुकपणे ‘क्या बात है’…हे उदगार बाहेर पडतात.

    सिनेमाची कथा, पटकथा उत्तम. जीवनात घडलेल्या घटनांची सुसंगत क्रमप्राप्तपणे मांडणी हि या सिनेमाची ताकद आहे. मूळ पात्र व सिनेमातील पात्र यांची छान पद्धतीने सांगड घातली आहे. सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे या सिनेमातील संवाद, “लोकांचा एकनाथ हो…अनाथांचा नाथ हो…” ही वाक्य प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. सिनेमात काही हळवे तसेच भावनिक प्रसंग दाखवले आहेत. आपली दोन लहानगी मुले अचानक देवाघरी गेल्यानंतर आईवडील यांना काय दुःख झाले असेल हे पाहताना डोळ्याच्या कडा पाणावल्या शिवाय राहत नाही, एवढे जिवंत प्रसंग उभे केले आहेत.

    सिनेमात वेशभूषेवर विशेष मेहनत घेतली आहे. प्रसाद ओक यांना उभेहूब आनंद दिघेंची व्यक्तीरेखा तयार करण्याचे काम वेशभूषाकारांना जाते. प्रसाद ओकनी आनंद दिघेंची जिंवत व्यक्तीरेखा साकारली असल्याचा अनुभव येतो. तसेच अन्य कलाकारांची वेशभूषा सुधा लाजवाब. सिनेमात गाणी कमी असली तरी संगीतात हा सिनेमा कमी पडला असं म्हणता येणार नाही. नवरात्रोत्सवातील एका गाण्यावर प्रंचड खर्च केल्याचं जाणवते. कारण गाण्यातील कलाकार, वेशभूषा, सजावट आदींवर बारकाईन लक्ष दिले आहे. कोरोग्राफर उमेश जाधव यांच्या नजरेतून नृत्याविष्कार पाहण्यासारख आहे. प्रसाद ओकसह क्षिदिज दाते, अभिजित खांडकेकर, योगेश शिरसाट, अंशुमन विचारे, जयवंत वाडकर, सुशांत शेलार तसेच प्रसाद खांडेकर यांनी सुधा वाखण्याजोगा अभिनय करत मूळ पात्र जिवंत केलेत. त्यामुळे हा सिनेमा आपणाला १९८९-९० क्या दशकात घेऊन जातो.

    कॅमेऱ्याच्या अनेक छटा विविध अँगेलने विहंगम, मनमोहक दृश्य चित्रित केले आहेत याची चुणूक सुधा सिनेमात दिसते. एक दोन पत्रातील त्रुटी मात्र प्रकार्षाने जाणवते. मूळ पात्र व सिनेमातील पात्र यात खूप विरोधाभास किंवा मोठी तफावत दिसते. व एक दोन गाण्याचा अभाव सुधा जाणवतो. एवढं सोडल्यास धर्मवीर हा सिनेमा फुल्ल पैसा वसूल आहे. साधा एक शिवसैनिक ते ठाणे जिल्हासंपर्कप्रमुख या प्रवासात आनंद दिघेंचं अनेक चढ-उतार दाखवले आहेत. अवघ्या ५० वर्षाचा कारकिर्दीत समाज्यासाठी वाहून घेतो हा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे हा मेसेज सुधा सिनेमातून देण्यात आलाय. तसेच प्रेक्षकांची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाचा शेवट करताना मात्र एक नकारात्मक दृश्य दाखवलेय. आनंद दिघे यांचा मृत्यू संशयास्पद झाला किंवा मृत्यूचे गूढ कायम ठेवले आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत दाखवला आहे. एकंदरीत सिनेमाची कथा, संवाद, संगीत अप्रतिम. प्रसाद ओक तसेच अन्य कलाकारांनी तगडा अभिनय केलाय, प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन उत्तम. चित्रपट बघून आनंद दिघे जिवंत असल्याचा भाष होतोय असा अभिनय प्रसाद ओकांनी केलाय. त्यामुळे प्रेक्षागृहात जावून पहावा असा हा सिनेमा आहे.