choreographer dharmesh

९० च्या दशकात सोनी टीव्हीवरील ‘बुगी वुगी’ या टॉप रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षण करणारे जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे दोघेही येत्या आठवड्यात ‘डान्स दिवाने ३’ मध्ये दिसणार आहेत.

  धर्मेश येलांडे हा आज सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या डान्सचे सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. डान्स प्लसमधून धर्मेश हे नाव घराघरात पोहचलं.  धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर असला तरी त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. पण तुम्हाला माहितेय का, धर्मेशने यापूर्वी ९० च्या दशकातला सुप्रसिद्ध ‘बुगी वुगी’ शोमध्ये भाग घेतला होता. सोनी टीव्हीवर झालेल्या ‘बुगी वुगी’ या शोमधून त्याने जिंकलेल्या ५ लाखांमधून वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फेडलं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

   

  डान्स दिवानेच्या मंचावर सांगितला किस्सा

  ९० च्या दशकात सोनी टीव्हीवरील ‘बुगी वुगी’ या टॉप रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षण करणारे जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे दोघेही येत्या आठवड्यात ‘डान्स दिवाने ३’ मध्ये दिसणार आहेत. नुकतंच कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘डान्स दिवाने ३’ शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये धर्मेश येलांडे जावेद जाफरी आणि नावेद जाफरी यांना संघर्षाची कहाणी ऐकवताना दिसतोय. यात धर्मेश म्हणतो, “ज्यावेळी मी तुमच्या शोमध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं, तो माझा यशाच्या मार्गाचा पहिला दरवाजा होता. वडील चहाची टपरी चालवत होते…त्यांच्याकडून घरखर्चाचा भार उचलला जात नव्हता…वडिलांवर खूप कर्ज झालं होतं…आणि त्यावेळेला मी डान्सच्या व्यतिरिक्त काहीच करत नव्हतो. त्यावेळेला मी तुमच्या शोमधून ५ लाख रूपये जिंकलो होतो.”

  धर्मेशची कहाणी ऐकल्यानंतर जावेदने त्याचं कौतुक केलं. “त्यावेळी लहानश्या वयात जबाबदारीचं भान, तु जे आता इथपर्यंत पोहोचलास ते तुझ्या वडिलांच्या आशिर्वादामुळेच…”, असं त्यावेळी जावेद म्हणाला.