dhinchak pooja troll

‘दिलोंका शूटर २.०’ (Dilo ka Shooter 2.0)नावाचे ढिंच्यॅक पूजाचे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या गाण्यावर नेटकऱ्यांचा भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.  ढिंच्यॅक पूजाला ट्रोलिंगचा(Dhinchak Pooja Trolled) सामना करावा लागत आहे.

  ‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली ढिंच्यॅक पूजाचं (Dhinchak Pooja)नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘दिलोंका शूटर २.०’ (Dilo ka Shooter 2.0)नावाचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या गाण्यावर नेटकऱ्यांचा भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.  ढिंच्यॅक पूजाला ट्रोलिंगचा(Dhinchak Pooja Trolled) सामना करावा लागत आहे.

  ढिंच्यॅक पूजाचे ‘दिलोंका शूटर २.०’ हे गाणे १५ ऑक्टोबर रोजी रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये ढिंच्यॅक पूजा गाडी चालवत गाणे गाताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला देखील काही मुले गाडीवर दिसत आहेत. ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर, मुझसा ना कोई क्यूटर’ असे या गाण्याचे बोल आहे. यूट्यूबवर हे गाणे १ लाख ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.


  ढिंच्यॅक पूजाच्या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका यूजरने ‘ढिंच्यॅक पूजाचे गाणे ऐकून माझ्या कानातून रक्त यायला लागले’ असे म्हटले आहे.

  दुसऱ्या एका यूजरने ढिंच्यॅक पूजाची गाणी ही टोनी कक्करपेक्षा चांगली असतात असे म्हटले आहे.

  ढिंच्यॅक पूजा एक प्रसिद्ध युटूबवर आहे. ती कायम नववनीन रॅप सॉन्ग प्रेक्षकांसाठी आणत असते. ‘बापू देदे थोडा कॅश’, ‘स्वॅग वाली टोपी’, ‘होगा ना करोना’, ‘दिलोंका शूटर’ यांसारख्या अनेक गाण्यांची निर्मिती आजवर तिने केली आहे.

  एकाने स्क्विड गेमचा फोटो वापरून ‘Your next Task is to listen Dhinchak pooja’s song’ असं लिहित हे वाईट गाणं ऐकणं म्हणजे मोठं आव्हान आहे हे अधोरेखित केलं आहे.

  ‘दिलोंका शूटर २.०’ गाण्यामध्ये ढिंच्यॅक पूजाने हेल्मेट न वापरता गाडी चालवली म्हणून  एकाने तर तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.