म्हणून शिल्पाने १० कोटींची ‘ती’ जाहिरात नाकारली, तिच्या निर्णयाचं सोशल मीडियावर होतय कौतुक!

अलिकडेच या अभिनेत्रीला एका जाहिरातीसाठी तब्बल १० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु शिल्पानं ही जाहिरात करण्यास साफ नकार दिला.

    बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री  म्हणून शिल्पा शेट्टीच नाव नेहमी अग्रेसर असतं. पुन्हा  शिल्पा सिनेसृष्टीत कार्यरत व्हायला सज्ज झाली आहे. शिल्पाची लोकप्रियता प्रचंड आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. ती आपले फोटो, योगाचे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते.

    अलिकडेच या अभिनेत्रीला एका जाहिरातीसाठी तब्बल १० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु शिल्पानं ही जाहिरात करण्यास साफ नकार दिला. ही एका स्लिमिंग पिल्सची (वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या) जाहिरात होती. मात्र अशा कुठल्याही गोळ्यांची जाहिरात न करण्याचा निर्णय शिल्पानं घेतला आहे.

    म्हणून नाकारली जाहिरात

    वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या जाव्या असा सल्ला वैद्यकिय तज्ज्ञ देतात. कारण अशा प्रकारच्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. शिवाय स्लिमिंग पिल्स घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळं शिल्पानं अशा कुठल्याही गोष्टीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. या नकारासाठी शिल्पाचं सोशल मीडियावर कौतुक देखील केलं जात आहे.