babys day out

हॉलिवूडचा चित्रपट म्हटलं की आजही डोळ्यासमोर येतो तो बेबीज डेआऊट हा चित्रपट. हा चित्रपट लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फेवरेट आहे. बेबीज डे आऊट हा चित्रपट एकदाच पाहिला असा प्रेक्षक क्वचितच सापडेल. या चित्रपटाने त्यावेळी सगळे बॉक्सऑफिसचे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाती बेबीने सगळ्यांवर भुरळ घातली होती. पण चित्रपटात दिसणारं ते गोंडस आज काय करतं तुम्हाला माहितेय? त्या बाळाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बेबीज डे आऊटमध्ये आपल्याला एकच गोंडस बाळ बघायला मिळाले होते. या चित्रपटात संपूर्ण कथा ही एकाच बाळाभोवती फिरत होती. पण प्रत्यक्षात चित्रपटात दोन बाळांनी कामं केली आहेत. चित्रपटात काम करण्यासाठी जुळ्या बाळांची निवड करण्यात आली होती. एक बाळ थकलं की दुसरं बाळ चित्रीकरण करायचं. त्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण करणं सोप्प गेलं. या चित्रपटाला अनेक वर्ष झाली असून हे दोघेही आता मोठे झाले आहेत.

या चित्रपटात अडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केली होती. आता हे दोघे २५ वर्षांचे झाले आहेत. या चित्रपटातनंतर हे दोघेही कोणत्याच चित्रपटात किंवा कार्यक्रमात दिसले नाहीत. पण लहानपणीच त्यांना मिळालेली प्रसिद्धी आजही टिकून आहे.