युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवलच्या २६ व्या आवृत्तीचा १ नोव्हेंबर रोजी डिजिटल शुभारंभ

  • युरोप आणि भारतातील ३७ भाषांतील ६० सिनेमांचे २६ व्या युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग होणार, ईयूएफएफ भारतीय सिनेमाचे लेजंड सत्यजीत रे यांना आदरांजली वाहणार
  • फेस्टिवलचा आरंभ १ नोव्हेंबर रोजी. प्रेक्षकांना फेस्टिवल स्कोप आणि ईयूएफएफ संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करता येणार

मुंबई : सिनेमा (Cinema) सर्व प्रकारे अतिशय ताकदवान माध्यम आहे, जे सीमेपलीकडे जाऊन आपल्याला एकत्र आणते, संघटितपणे उभे राहाण्यास मदत करते. सिनेमा आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी, आपली भीती तसंच आशा व्यक्त करण्यासाठी, आपल्या आतल्या आवाजाशी जोडण्यासाठी माध्यम देते. युरोपमध्ये डोकावण्यासाठी खिडकी देणारा, बहुप्रतीक्षित २६ वा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल १ नोव्हेंबरपासून आपल्या डिजिटल रूपात सुरू होत आहे.

या फेस्टिव्हलमध्ये असामान्य, पुरस्कार विजेते युरोपियन सिनेमे (European cinema), प्रेरणादायी कथा असं बरंच काही आपल्याला घरीच राहून अनुभवता येणार आहे. हा फेस्टिवल युरोपियन सिनेमा आणि संस्कृतीची वैविध्यता व सखोलता साजरा करणारा आहे. या फेस्टिवलचे आयोजन डेलिगेशन ऑफ द युरोपियन युनियन टु इंडिया, सदस्य राज्ये, सहकारी देशांद्वारे भारतीय व युरोपियन भागिदारांच्या मदतीने केले जाणार आहे.

या महिनाभर चालणार असलेल्या फेस्टिवलमध्ये ८ वेगवेगळ्या विभागांतील ३७ भाषांतील ६० सिनेमे पाहायला मिळतील. हे सिनेमे २७ सदस्य राज्ये, सहकारी देशांतील अनोख्या कथा इतिहास कलात्मकतेने गोष्टीरूपात सादर करतील व कान्स, लोकार्नो, सॅन सबॅस्टियन, कारलोव्ही व्हेरी आणि व्हेनिस येथे मिळालेला सिनेमॅटिक विजय साजरा करतील. या फेस्टिवलमध्ये प्रख्यात भारतीय दिग्दर्शक सत्यजीत रे यांचा पथेर पांचाली दाखवून त्यांना १०० व्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहिली जाईल. धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलने खास, आधुनिक भारतीय विभाग तयार केला असून त्यात हिंदी, मराठी, मल्याळम आणि बंगाली या चार भारतीय अधिकृत भाषांमधले सहा सिनेमे दाखवले जातील.

या फेस्टिवलमध्ये प्रत्येक सिनेमाप्रेमीसाठी काहीतरी देण्यात येत आहे. त्यामध्ये आधुनिक युरोपियन सिनेमापासून युरोपियन सिनेमातले दिग्गज, सह- निर्मिती, निवडक शॉर्ट फिल्म्स, वातावरण बदलावर आधारित सिनेमे, सिनेमाचं शिक्षण, आधुनिक भारतीय सिनेमे, ऐतिहासिक भारतीय सिनेमांपर्यंत आठ विभागांचा समावेश आहे. ईयूएफएफद्वारे दुसऱ्या सिनेमा रित्रोव्हातो फेस्टिवलच्या सहकार्याने या खंडात बनलेले प्राथमिक आणि ऐतिहासिक ठरलेले, डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले सिनेमे नवे प्रेक्षक व पिढ्यांना दाखवून युरोपचा असामान्य सिनेमॅटिक वारसा साजरा केला जाईल.

ईयूएफएफचे महत्त्व विशद करताना युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत एच. ई. उगो अस्तुतो म्हणाले, युरोपियन फिल्म फेस्टिवलच्या २६ व्या आवृत्तीमध्ये प्रेक्षकांना युरोप जाणून घेण्याची, कथाकारांच्या नजरेतून युरोपचा प्रवास करण्याची संधी मिळेल. आमच्या गेल्या आवृत्तीला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर युरोप तसेच भारतातील क्लासिक सिनेमांसाठी वेगळा विभाग परत समाविष्ट केला जाणार आहे. प्रेक्षक या महिनाभर चालणाऱ्या फेस्टिव्हलचा आनंद घेतील अशी आशा आहे.’

भारताला युरोपची झलक दाखवणाऱ्या या फेस्टिवलमध्ये युरोपियन देशांमधले सिनेमे दाखवले जाणार असून त्यात ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सिप्रस, झेकिया, डेन्मार्क, ईस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आर्यलंड, इटली, लात्विया, लिथुआनिया, लक्सेंम्बर्ग, माल्टा, द नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वीडन या २७ सदस्य राज्यांचा समावेश आहे.

फिल्म क्युरेटर आणि प्रोग्रॅमर व्हेरोनिका फ्लोरा यांनी व्हॅलेरियो कारूसा, सिनेयुरोपा, ईयूएफएफ इंडियाचे दिग्दर्शक यांच्या सहकार्याने तयार केलेला हा फेस्टिवल भारतीय प्रेक्षकांना लोकांचा आणि देशाचा सुख- दुःख, वैताग आणि आनंद, भीती आणि धाडस यांनी भरलेला दैनंदिन प्रवास घडवेल.

ईयूएफएफ फिल्म क्युरेटर व्हेरोनिका फ्लोरा म्हणाल्या, ‘पडदा ही एक खिडकी आहे. सिनेमा हा प्रवास आहे. कलेच्या या असामान्य रूपामुळे आपल्याला जगाच्या रंगमंचाकडे, अथांग मानवी आत्म्याच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळते. सिनेमा आपल्याला आपल्या पिढीचे दर्शन घडवतो आणि भविष्याची सैर करवतो. ईयूएफएफ इंडिया २०२१ आवृत्तीमधीलसिनेमांच्या विस्तृत आणि बहुआयामी प्रकारांच्या माध्यमातून आपल्याला हक्क व स्वातंत्र्यासाठी एकत्रित येणारे लोक, शाळेला जाण्यासाठी संघर्ष करणारी मुले पाहाता येतील तसंच वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीर आपल्या पृथ्वीच संरक्षण करण्यासाठी आपल्या पिढीची वाढती जागरूकता जाणून घेता येईल.’

ईयूएफएफ क्युरेटर व्हॅलेरियो कारूसो म्हणाल्या, ‘ईयूएफएफ इंडियातून प्रेक्षकांना बहुसंवेदी सिनेमॅटोग्राफिक अनुभव तसेच वेगवेगळ्या संस्कृतींमधील सांगीतिक अनुभूती मिळणार आहे. त्यांच्या समान आणि वेगवेगळ्या गुणधर्मांच्या मिलाफातून आपल्याला परत एकदा आपल्या समाजाच्या संपत्तीचे प्रतिबिंब आणि ताकद कळून येईल. त्याशिवाय आम्ही दर्शकांसाठी युरोपमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांतील वेगवेगळे ऑनलाइन साइड इव्हेंट्सचे आयोजन करणार आहोत व त्यामध्ये दिग्दर्शकांमधील ऐतिहासिक, परस्पर प्रभावातून निर्माण होणारे ध्वनी आणि स्वर, तज्ज्ञ आणि निर्मात्यांची सिनेमाच्या स्वरुपातील मते विशेषतः वाढत्या आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दलचे त्यांचे मनोगत यांचा त्यात समावेश असेल. या चर्चासत्रांदरम्यान आपल्याला सिनेमाचे इतर कलांवर असलेले अवलंबित्व – चित्रांपासून संगीतापर्यंत आणि नाटकापासून साहित्यापर्यंत तसेच कवितांपासून फोटोग्राफीपर्यंतच्या कलांशी असलेले नाते, शिवाय नव्या पिढ्यांसाठी सिनेमाची मूलभूत साधन म्हणून असलेली भूमिका यांचा परामर्श घेतला जाईल.’

कॅलिडोस्कोप

वेगवेगळे प्रकार, संकल्पना, प्रभाव आणि कित्येक पिढ्यांदरम्यान झालेल्या विस्ताराची समृद्धी, या वर्षासाठी आखण्यात आलेल्या सिनेमांची श्रेणी युरोपची झलक दाखवले. या फेस्टिवलमध्ये खास तयार करण्यात आलेल्या आठ वर्गांचा समावेश आहे – ‘युरोरामा : युरोपियन सिनेमा टुडे, कंटेम्पररी इंडियन सिनेमा, फिल्म एज्युकेशन : ग्रोइंग अप विथ सिनेमा, ग्रीन सिनेमा, अड्रेसिंग क्लायमेट चेंज, सिनेमा टुगेदर : को- प्रॉडक्शन इन अँड आउट ऑफ युरोप आणि इन फ्यू वर्ड्स : अ शॉर्ट फिल्म सिलेक्शन.’

Il सिनेमा रित्रोव्हातो फेस्टिवहलच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली सिनेमांची श्रेणी काही गुंतवून ठेवणाऱ्या कथांमधून या खंडात अलीकडेच घडून गेलेल्या इतिहासाचा धांडोळा घेईल. प्रवर्तकीय हंगेरियन दिग्दर्शक मार्ता मेहझारोस द गर्लपासून झेक दिग्दर्शक झिरी मेंझेल यांचा ऑस्कर विजेता क्लोजली वॉच्ड ट्रेन्स, रॉबर्टो रोसेलिनी यांचा निओरिअलिस्ट ड्रामा रोम, ओपन सिटी आणि वांडा जाकुबोवस्का यांचा द लास्ट स्टेड या सिनेमांचा समावेश असलेल्या या विभागातून 20 व्या शतकाच्या मध्यावरचा युरोप खोलवर जाणून घेता येईल.

त्याशिवाय या विभागात वेगवेगळ्या कलाप्रकारांमधील परस्परसंबंध, सुप्रसिद्ध लेखक गुस्ताव्ह फ्लॉबर्ट यांच्या जन्माच्या द्विशताब्दी वर्षात भारतात इथल्या फ्रेंच दुतावासाच्या सहकार्याने युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल आपला सर्वात प्रतीकात्मक आणि अमर मास्टरपीस मॅडम बोव्हरी दाखवला जाणार आहे. क्लॉडे काब्रोलच्या 1991 सिनेमाच्या या रुपांतरणामध्ये इझाबेल हुपर्ट आणि इन्स्टिट्यूट फ्रॅन्सेस व फ्रेंच बुक ऑफिस यांनी तयार केलेले फ्रेंच साहित्यातील पुरातन पात्र पाहायला मिळेल.

भारतीय सिनेमेटोग्राफीला आदरांजली वाहाण्यासाठी सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दी वर्षात पोएट्री ऑन स्क्रीन : मास्टरपीसेस ऑफ इंडियन सिनेमा या विभागात प्रेक्षकांना क्लासिक सिनेमांचा आनंद घेता येईल. त्यामध्ये पथेर पांचाली आणि उदय शंकर यांचा क्रांतीकारी सिनेमा कल्पना यांचा समावेश असेल. कंटेम्पररी इंडियन विभाग धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलने खास तयार केला असून त्यामध्ये देशभरातील वैविध्यपूर्ण कथा पडद्यावर जिवंत होताना पाहायला मिळतील.

समाजाशी संबंधित विषय

जागतिक पातळीवर संबंधित असलेले विषय उदा. पर्यावरणीय बदल, लिंगसमानता, महिला सक्षमीकरण आणि एलजीबीटीक्यू हक्क यांवरही सिनेमा विभागात भाष्य करण्यात आले आहे. सीरीज आणि शर्ट फिल्म्सच्या माध्यमातून हवामानविषयक समस्यांचा आढावा घेण्यात आला असून त्याचा सर्वदूर होत असलेला परिणाम व या समस्येवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनाही त्यात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. हे सिनेमे केवळ आपल्याला हवामानात होत असलेल्या बदलांविषयी सांगत नाहीत, तर त्याच्याशी लढण्यासाठी काय थेट कृती करता येईल हे ही सांगतात. साइड इव्हेंटदरम्यान आम्ही वेगाने वाढत असलेल्या शूटिंगच्या ‘हरित’ पद्धतींचे शिष्टाचारही पाळणार आहोत.

सह- निर्मिती आणि फिल्म एज्युकेशन

या फेस्टिवलमध्ये युरोपियन सिनेमॅटोग्राफीमधल्या सहयोगी वृत्तीला आदरांजली म्हणून सह- निर्मितीच्या मालिकेचा समावेश करण्यात आला असून सिनेमा साक्षरता व दृकश्राव्य कामाच्या प्रसाराचा ग्रोईंग अप विथ सिनेमा या तरुण प्रेक्षकांसाठीच्या खास विभागात उल्लेख करण्यात आला आहे. या विभागातून सिनेमाच्या शिक्षणाविषयी जाणून घेता येणार असून त्यात युरोपियन व भारतीय तज्ज्ञांचा समावेश असेल.

इंडो- युरोपियन सांस्कृतिक देवाणघेवाण

वेगवेगळे प्रकार, संकल्पना, प्रभाव आणि कित्येक पिढ्यांदरम्यान झालेल्या विस्ताराची समृद्धी, या वर्षासाठी आखण्यात आलेल्या सिनेमांची श्रेणी युरोपची झलक दाखवेल. त्याला खास साइड इव्हेंट्सची जोड दिली जाणार असून त्यात युरोप व भारतीय सिनेमा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. या कार्यक्रमांत निवडीदरम्यान लक्ष वेधण्यात आलेल्या समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. भारत- युरोपियन देवाणघेवाण कार्यक्रमांमध्ये भारतीय कथालेखकांसाठी कथा विकास कार्यशाळा – जर्नी टु युरोप कॉलचे संकलन यावर्षाच्या सुरुवातीला डेलिगेशनने लाँच केले होते. त्यातून युरोप व भारतातील सर्जनशील व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी या फेस्टिवलचा असलेला पाठिंबा अधोरेखित होतो. ३० तरुण, गुणवत्तापूर्ण भारतीय कथालेखकांची कॉलद्वारे निवड करण्यात आली असून ते फेस्टिवलदरम्यान विविध प्रशिक्षण उपक्रमांत सहभागी होतील. त्यातील दोघांना सांस्कृतिक प्रवासासह पुरस्कृत केले जाणार असून युरोपियन फिल्म फेस्टिवल्समधील सर्वात महत्त्वाच्या एका फिल्म कम्युनिटीला भेटता येईल व २०२२ मध्ये त्यांच्य सिनेमाच्या प्रकल्पांचे काम सुरू ठेवता येईल.

फिल्म फेस्टिवलसाठी प्रवेश

फिल्म फेस्टिवल आणि संबंधित साइड इव्हेंट्सची तिकिटे प्रेक्षकांसाठी मोफत असतील. प्रेक्षकांना डेलिगेशनच्या संकेतस्थळावर तसेच सोशल मीडिया चॅनेल्सवर नोंदणी करता येईल. हा फिल्म फेस्टिवल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहाणार आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार लॉग इन करता येईल. इथे नोंदणी करा:

https://www.festivalscope.com/page/euff-india-a-window-to-europe/

ईयूएफफविषयी अधिक माहितीसाठी: https://euffindia.com/