‘ही’ अभिनेत्रीही ठरली कास्टिंग काऊची शिकार, दिग्दर्शकबरोबरचं संभाषण वाचून तुमच्याही अंगावर उभा राहिल काटा!

मला वाटलं त्यांना त्याबदल्यात पैसे हवे असतील. त्यामुळे मी त्यांना पैसे हवे असतील तर घ्या, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी नाही असं म्हटलं. नंतर त्यांनी मला शेजारी झोपण्याबाबत सांगितलं.

  हॉलिवूडनंतर, बॉलिवूडमध्येही मीटू चळवळ प्रचंड गाजली. अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तन आणि लैंगिक शोषणाबद्दल खुलेआम भूमिका मांडली. बॉलिवूडनंतर पाकिस्तानच्या चित्रपटसृष्टीतही अनेक दिग्गज अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानच्या या अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे. या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव सबा बुखारी असं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Saba Bukhari (@saba_bukharii)

   

  सबा बुखारीने नेमकं काय सांगितलं?

  सबा बुखारी या अभिनेत्रीला एक भूमिका मिळाल्यानंतर एका दिग्दर्शकाने शेजारी झोपायची ऑफर दिली होती. त्याबाबत तिने मुलाखतीत सांगितलं. “मला रोल मिळाल्यानंतर एक फोन आला. त्यांनी मला सांगितलं, रोल तर तुम्हाला मिळाला आहे. आम्ही तुम्हाला चांगली भूमिका आणि पैसेही देऊ. पण त्याबदल्यात आम्हाला तुमच्याकडून काहीतरी हवंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Saba Bukhari (@saba_bukharii)

  मला वाटलं त्यांना त्याबदल्यात पैसे हवे असतील. त्यामुळे मी त्यांना पैसे हवे असतील तर घ्या, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी नाही असं म्हटलं. नंतर त्यांनी मला शेजारी झोपण्याबाबत सांगितलं. माझ्या तर पायाखलची जमीनच सरकली. मी लगेच फोन कट केला”, असं सबाने मुलाखतीत सांगितलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Saba Bukhari (@saba_bukharii)