kedar shinde and kishori pednekar

मराठी दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे (Kedar Shinde ReactionAbout Mayor Viral Video)यांनी महापौर किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ शेअर करत एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबईत(Mumbai) खड्ड्यांची समस्या(Potholes In Mumbai) मुंबईकरांच्या जणू पाचवीलाच पुजली आहे. अनेकदा यावर तक्रार करुनही पालिकेकडून खड्य्यांची कामे फारशी चांगली होताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे थेट शिवसेनेवर खड्ड्यांमुळे टीका होते. याच पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar) यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांना सुनावलं. खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. हे सगळं माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झाल्याने ही व्हिडिओ क्लिप व्हायरल(Viral Video Of Kishori Pednekar) झाली. मात्र, आता या क्लिपवर अनेक जण टीका करताना दिसत आहेत.

    मराठी दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांनी देखील महापौरांचा व्हिडिओ शेअर करत एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘काय काय करतात आपल्यासाठी हे. आणि आपण फक्त खड्ड्यांविषयी तक्रारी करतो…’, असे लिहित त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत #Sarcasm असं केदार शिंदेंनी लिहिलं आहे.

    मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती पाहण्यासाठी २७ सप्टेंबरला महापौर किशोरी पेडणेकर घराबाहेर पडल्या. त्यांच्यासोबत काही वॉर्ड अधिकारीही होते. महापौरांनी  रस्त्याची पाहणी केली आणि एका ठिकाणी जास्त खड्डे दिसल्याने महापौर संतापल्या. त्यांनी थेट अधिकाऱ्याची फाईल फेकण्याचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांना सुनावलं.

    महापौरांकडून अधिकाऱ्यांची शाळा घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. हा व्हिडीओ भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट केला आणि महापौर किती सहज अभिनय करतात असा टोला लगावला.