bramhastra

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शिखा आणि ईशाची म्हणजेच रणबीर-आलियाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात शिवाला प्रेमातून आपल्या शक्तीची जाणीव कशी होते हे दाखवण्यात आले आहे. तर आता दुसरा भागाची कथा देवचा संघर्ष दाखवण्यात येणार.

    ब्रह्मास्त्र चित्रपटाचा पहिला भाग सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीर-आलिया ची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या 15 व्या दिवशी म्हणजेच आज हा चित्रपट 10 कोटींची कमाई करणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एवढेच नाही तर या चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्या दरम्यान आता चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने दुसऱ्या भागाशी संबंधित एक मोठी अपडेट दिली आहे.

    दिग्दर्शक अयान मुखर्जीने पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या भागासंबंधित एक मोठा खुलासा केला आहे. अयानने सांगितले की, ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात शिखा आणि ईशाची म्हणजेच रणबीर-आलियाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात शिवाला प्रेमातून आपल्या शक्तीची जाणीव कशी होते हे दाखवण्यात आले आहे. तर आता दुसरा भागाची कथा देवचा संघर्ष दाखवण्यात येणार. त्याची कथा खूप मनोरंजक असणार असं त्याने सांगितलं. भाग 1 बद्दल बोलायचं तर, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र, आता चित्रपटाच्या व्यवसायात सातत्याने घसरण होत आहे. त्याचवेळी चित्रपटाच्या 14व्या दिवशीच्या म्हणजे दुसऱ्या गुरुवारी चित्रपटाने जवळपास 3.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह देशभरात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 230 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.