shalini thackeray and hemant dhome

राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’ (Sunny)चे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीची दखल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray Reply To Hemant Dhome) यांनी घेतली आहे.

    ‘सनी’ (Sunny) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे. अशातच कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग घेऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी (Hemant Dhome) संपर्क साधला. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीची दखल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray Reply To Hemant Dhome) यांनी घेतली आहे.

    हेमंत ढोमेनी ट्विटरवर लिहिले की, “थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’ याबाबत कठोर कायदा यायला हवा.

    यावर शालिनी ठाकरेंनी ट्विटरवर उत्तर दिलं आहे की,“मराठी चित्रपटांना प्राईम टाईम आणि थिएटर न देण्याचा घाणेरडा खेळ पुन्हा एकदा थिएटर,मल्टिप्लेक्स मालकांनी सुरू केलाय. पण याद राखा. #मराठी चित्रपटांना मान दिला नाही, त्यांचा व्यवसाय रोखण्याचा प्रयत्न केला गेला तर गाठ मनसेशी आहे. कुणाचा माज कसा उतरवायचा हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे.”