ॲनिमल 2 बद्दल दिग्दर्शन संदीपनं दिलं अपडेट, ‘या’ दिवशी सुरू होणार शुटींग!

ॲनिमलचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाने सांगितलं की चित्रपटाचं शूटिंग 2026 पर्यंत सुरू होणार आहे.

    संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ॲनिमल (Animal) चित्रपट 2023 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटानं बॅाक्सऑफिवर 556 कोटीचा गल्ला जमवला होता. चित्रपटाला यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग जाहीर केला होता, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाबाबत वेळोवेळी नवनवीन आणि रंजक माहिती समोर येत असते, ज्याची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. आता चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाने चित्रपटाबद्दल नवं अपडेट दिलं आहे.

    ॲनिमल 2 बद्दल अपडेट

    ‘ॲनिमल’च्या दुसऱ्या भागासाठी म्हणजेच ‘ॲनिमल पार्क’साठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. चित्रपटाचे शूटिंग थोडे उशिराने सुरू होणार आहे.  दिग्दर्शक  संदीप रेड्डी वंगाने याबाबत सांगितलं की,  या चित्रपटाचे शूटिंग 2026 मध्येच सुरू होईल.

    या चित्रपटाबद्दल बोलताना संदीप रेड्डी वंगा म्हणाले की, ‘ॲनिमल पार्क’ हा ‘ॲनिमल’ चित्रपटापेक्षा मोठा आणि चित्रपटात भरपूर ड्रामा असणार आहे. चित्रपटाचे शूटिंग 2026 पर्यंत सुरू होणार आहे. आता चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी आणि अधिक ॲक्शन सीक्वेन्स असणारी असेल अशी अपेक्षा आहे. यावर वेगाने काम केले जाणार असून, काही कालावधीनंतर त्याची तयारी सुरू होणे अपेक्षित आहे.