क्रिएटिव्ह हेड व दिग्दर्शक विवेक वाघ यांच्या ‘जक्कल’ या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! 

दहा निरपराध लोकांच्या खुनाची मालिका पुणे शहराने अनुभवली. आणीबाणीच्या कालखंडातील या हत्याकांडांमुळे संपूर्ण पुणे शहर वेठीला धरले गेले होते.

    नुकतेच ६७वा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यात ‘जक्कल’ या मराठी माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘सर्वोत्कृष्ट इन्वेस्टगेटिव्ह चित्रपट’ या नामांकनाअंतर्गत हा पुरस्कार मिळाला असून याचे दिग्दर्शन कल्चरल कॅनव्हास एंटरटेनमेंटचे क्रिएटिव्ह हेड व प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांनी केले आहे.

    दहा निरपराध लोकांच्या खुनाची मालिका पुणे शहराने अनुभवली. आणीबाणीच्या कालखंडातील या हत्याकांडांमुळे संपूर्ण पुणे शहर वेठीला धरले गेले होते. हे हत्याकांड घडवून आणणाऱ्यांचा प्रमुख राजेंद्र यलाप्पा जक्कल हा होता. ह्या सगळ्या घटनेचा, जक्कल वृत्तीचा, गुन्ह्याच्या तपासाचा, कायद्याचा असा मागोवा ह्या महितीपटामधून घेण्यात आलेला आहे. या माहितीपटावर आधारित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.