disha patani bralet top

दिशा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्याविषयीच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दिशाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दिशा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने एक पांढरी स्लिंग बॅग घेतली होती. तसेच हातात पांढऱ्या रंगाचे जॅकेट धरलेले होते, लाल ब्रालेट टॉप आणि डेनिम शॉर्ट्स असा तिचा लूक दिसत आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चित्रपटापेक्षा ती कोणाला डेट करत आहे तसेच तिने कोणते ड्रेस घातले (Disha patani Video), नवं कोणतं फोटोशूट केलं यामुळे चर्चेत असतेय. दिशा पटानीचं टायगर श्रॉफ बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ती सध्या तिच्या मित्राला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या दिशा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे ते कारण म्हणजे तिचा ड्रेस. दिशाला नेटकऱ्यांनी एका ड्रेसमुळे ट्रोल (Disha Patani Trolled) केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


    दिशा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्याविषयीच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दिशाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दिशा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने एक पांढरी स्लिंग बॅग घेतली होती. तसेच हातात पांढऱ्या रंगाचे जॅकेट धरलेले होते, लाल ब्रालेट टॉप आणि डेनिम शॉर्ट्स असा तिचा लूक दिसत आहे.

    दिशाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने व्हिडिओवर कमेंट करत लिहले आहे, “हिला कोणीतरी चांगले कपडे द्या,” तर दुसऱ्याने लिहले आहे, “तुमची फिगर दाखवण्यासाठी तुम्हाला नग्न असण्याची गरज नाही, तुम्ही सभ्य कपडे घालूनही ते दाखवू शकता” अशा शब्दात ऐकवलं आहे. एकाने तर तिची उर्फीसोबत तुलना करत लिहले की “ही महागडी उर्फी आहे.”

    दिशा पटानी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमबरोबर ‘एक व्हिलन २’मध्ये दिसली होती. आता ती ‘योद्धा’ आणि ‘किक २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.