दिशा पटानीचा समुद्रकिनाऱ्यावर हाॅट अंदाज, पहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी, अभिनेत्रीने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचवेळी, अभिनेत्रीने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्राच्या लाटांसोबत चालताना दिसत आहे. दिशा पटानी पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स आणि ब्रॅलेट टॉप घालून बीचवर मस्ती करताना दिसत आहे. ती तिच्या खास अदांनी चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करताना दिसत आहे.

    तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहते सतत लाईक करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री दिशा पटानी अभिनीत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

    या चित्रपटात दिशा पटानी व्यतिरिक्त अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहम हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र, या चित्रपटाला चाहत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आशिमा छिब्बरचा ‘के टीना’, मोहित सुरीचा ‘मलंग 2’ आणि सागर आंब्रेचा ‘योद्धा’ यांचा समावेश आहे.