disha vakani

एका मुलाखतीत दिव्यांकानं तारक मेहताची ऑफर मिळाल्याचं मान्य केलं. सुरुवातीला तिनं ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण आता ती या भूमिकेबद्दल विचार करत आहे.

    तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिशा वकानी म्हणजेच दया बेन मालिकेत कधी परतणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाच्या निमित्तानं मालिकेतून ब्रेक घेणारी दिशा तीन वर्षानंतरही परतलेली नाही त्यामुळं चाहते नाराज आहेत. परंतु चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे.

    तारक मेहतामध्ये दया बेनची लवकरच एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही व्यक्तिरेखा आता दिशा वकानी ऐवजी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी साकारणार अशी शक्यता आहे.एका मुलाखतीत दिव्यांकानं तारक मेहताची ऑफर मिळाल्याचं मान्य केलं. सुरुवातीला तिनं ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण आता ती या भूमिकेबद्दल विचार करत आहे.

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ ला या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १३ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांचं मोनंरजन करत आहे. पण गेले ३वर्ष दया बेनला चाहते खूप जास्त मिस करत आहे. दया बेन कधी येणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.