dnyanda and chetan in thipkuanchi rangoli

‘ठिपक्यांची रांगोळी’(Thipkyanchi Rangoli) या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanda Ramtirthkar)आणि चेतन वडनेरे(Chetan Wadnere) ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    छोट्या पडद्यावर सुरु होणाऱ्या ‘ठिपक्यांची रांगोळी’(Thipkyanchi Rangoli) या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanda Ramtirthkar)आणि चेतन वडनेरे(Chetan Wadnere) ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah)या मालिकेत दोघे अपूर्वा आणि शशांक या व्यक्तिरेखा साकारत आहे. ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

    या मालिकेतल्या भूमिकेविषयी ज्ञानदा म्हणाली की, मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका साकारत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकेच्या टीममध्ये बरेच दिग्गज कलाकार आहेत. आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी अतिशय छान पद्धतीनं मला ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. सेटवरचं सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी नवी ऊर्जा देणारं आहे. अपूर्वा साकारताना तिची एनर्जी कॅरी करणं सुरुवातीला थोडं कठीण गेलं, मात्र हळूहळू सवय होत असल्याचं ज्ञानदा म्हणाली.

    शशांक साकारणारा चेतन म्हणाला की, शशांक हा अतिशय हुशार मुलगा आहे. तो वैज्ञानिक आहे. परदेशात कामाची संधी मिळत असली तरी कुटुंबाला सोडून त्याला परदेशी जाण्याची इच्छा नाही. त्याचा त्याच्या कुटुंबावर खूप जीव आहे. संस्कार आणि मूल्यं जपणाऱ्या शशांकच्या आयुष्यात जेव्हा त्याच्या विरोधी विचारांची मुलगी येते, तेव्हा नेमकं काय होतं हे मालिकेत पाहायला मिळेल.