कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर जमू नका, सलमानचे आपल्या चाहत्यांना आवाहन

सलमान खानच्या वाढदिवशी चाहते आदल्या दिवसाच्या रात्रीपासून सलमानची एक झलक पाहायला आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या गर्दीने जमत असतात. परंतु देशावर कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज ५५ वा वाढदिवस आहे. सलमानच्या वाढदिवशी त्याच्या राहत्या घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणीही घराबाहेर जमू नका. असे सलमान खान याने म्हटले आहे.

सलमान खानच्या वाढदिवशी चाहते आदल्या दिवसाच्या रात्रीपासून सलमानची एक झलक पाहायला आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या गर्दीने जमत असतात. परंतु देशावर कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरु नये यासाठी सलमानने चाहत्यांना घराबाहेर जमू नका असे आवाहन केले आहे.