‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नाट्यमय वळण, यश नेहासमोर मनातील भावना व्यक्त करु शकेल का ?

झी मराठीवरील (Zee Marathi) ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेचं कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. याच वातावरणात मालिकेत आता एक नाट्यमय वळण येणार आहे.

    झी मराठीवरील (Zee Marathi) ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका अतिशय गाजत आहे. त्यामधील श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behre) जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे. या मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेचं कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. याच वातावरणात मालिकेत आता एक नाट्यमय वळण येणार आहे.

    सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की परांजपेचं खरं रूप सगळ्यांसमोर येतं आणि नेहाशी त्यांचं लग्न मोडतं. आपल्या मनात नेहाबद्दल प्रेम असल्याच्या भावनेची जाणीव तर यशला झाली आहे, पण नेहासमोर ते प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत तो करत नाहीय. अनेकदा आपली खरी ओळख नेहाला सांगण्याचा प्रयत्न यश करतो, पण ते ही अपयशी ठरतं.

    परांजपे यशचा वचपा काढण्यासाठी यशच्या आधीच नेहाला त्याची खरी ओळख सांगतो आणि नेहाला या गोष्टीचा धक्का बसतो. दुसरीकडे समीर यशला नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आग्रह करतो. यश नेहाला सगळं खरं सांगण्याचं मनाशी पक्क करतो, पण त्याच्याआधीच नेहाला यशाची खरी ओळख पटल्यामुळं नेहा आता यशची बाजू ऐकून घेईल का ? यश नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करू शकेल का ? नेहा आणि यशच मैत्रीचं नातं प्रेमात बदलेल की तिथंच संपेल ? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.