nawazuddin

मिळालेल्या माहितीनुसार,7 सप्टेंबर रोजी दुबईच्या ‘रेंटल डिस्प्युट सेंटर’चे काही अधिकारी दुबईतील आलिया सिद्दीकीचं घर रिकामं करण्याची नोटीस घेऊन आले होते.

    गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि आलिया (Aaliya) यांच्यात वाद सुरु आहेत. आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ते दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर आलिया आपल्या मुलांबरोबर दुबईत (Dubai) राहतेय,तर नवाज आपल्या कुटुंबाबरोबर मुंबईत राहत आहे. मात्र, आता आलियासंदर्भातली आणखी एक बातमी समोर आली आहे. आलियाला दुबई सरकारने एक नोटीस पाठवली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,7 सप्टेंबर रोजी दुबईच्या ‘रेंटल डिस्प्युट सेंटर’चे काही अधिकारी दुबईतील आलिया सिद्दीकीचं घर रिकामं करण्याची नोटीस घेऊन आले होते. भाडे न भरल्यामुळे तिला दुबई सरकारकडून हद्दपारीची नोटीस मिळाल्याचं सांगितलं जातंय.

    नोटीसमध्ये म्हटले आहे की भाडे न दिल्यास, आलियाला 27.183 दिरहम भाडे मूल्याच्या आर्थिक मागणीसह मालमत्ता रिकामी करावी लागेल अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नोटिशीत म्हणले आहे. हद्दपारीच्या भीतीने आलिया दुबईतील भारतीय दूतावासाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    दरम्यान काही दिवसांपासून आलियाच्या आयुष्यात नवी व्यक्ती आली असल्याची चर्चा होती. आलियाने इन्स्टाग्रामवर एका मिस्ट्री मॅनबरोबरचा रोमँटिक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला  ट्रोल केलं होतं. यानंतर आता आलियाने एका मुलाखतीदरम्यान या ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा केला होता आलिया म्हणाली होती की, “होय, मी माझ्या आयुष्यात पुढे गेले असून, आमचं नातं मैत्रीपेक्षा जास्त आहे. आमच्यात नातं आहे पण, कोणतीही कमिंटमेंट नाही.”