Dunki (5)

डंकीने रविवारी म्हणजेच चौथ्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी 31.50 कोटी रुपयांची कमाई केली.

    दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तर दुसऱ्या दिवशी सालार सारख्या सिनेमानं टक्कर दिल्याने दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला समाधानकारक कमाई करता नाही आली. मात्र आता तिसऱ्या चौथ्या दिवशी विकेंडचा डंकीला चांगला फायदा झाल्याचे दिसत आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी दिवशी बॅाक्स ऑफिसवर (Dunki Box Office Collection Day 4) 31.50 कोटी कमावले आहेत.

    ‘डंकी’ने रविवारी सर्वाधिक कमाई केली

    sacnilk च्या रिपोर्टनुसार, डंकी चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 20 कोटी झालं होतं. तर तिसऱ्या दिवशी डंकीनं 26 कोटींची कमाई केली आहे. चौथ्य दिवशी  म्हणजेच रविवारी चित्रपटानं सर्वाधिक कमाई केली आहे. चौथ्या दिवशी 31.50 कोटी रुपयांची कमाई केली, जे आतापर्यंतचे सर्वोत्तम कलेक्शन ठरले आहे. एकूण चार दिवसांत चित्रपटाने 106.43 कोटींची कमाई केली आहे.

    कसा आहे डंकी?

    जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्यचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्पटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.