
अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार असलेल्या नुसरत जहां यांनी निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे सांगितले आहे. २०१९ मध्ये दोघांनी केलेले लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां गेल्या अनेक दिवस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नुसरतची रिलेशनशिप आणि प्रेग्नन्सीची बातमी समोर आली आणि त्यानंतर तिचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. आता खुद्द नुसरतनं तिचे फोटो शेअर केले आहेत. नुसरतनं पांढरा टॉप, निळा जीन्स परिधान केला आहे आणि गुलाबी रंगाची शालही कॅरी केली आहे.
अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार असलेल्या नुसरत जहां यांनी निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे सांगितले आहे. २०१९ मध्ये दोघांनी केलेले लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे. पैशाचा दुरुपयोग, दागिने आणि अन्य संपत्ती अवैधरित्या निखिलने घेतली असल्याचा आरोप तिने केला आहे. निखिल आणि नुसरत गेल्या सहा महिन्यांपासून सोबत राहत नसल्याची माहिती आहे. तसेच नुसरत गर्भवती असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
View this post on Instagram
नुसरतच्या प्रेग्नन्सीबद्दल बातमी समोर आल्यानंतर निखिल जैन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की आम्ही ६ महिन्यांपासून वेगळे राहतोय. आमचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. निखिलनं असंही सांगितलं की त्यांचा बराच वेळ नुसरतशी संपर्क नव्हता. त्यामुळे नुसरतच्या पोटात असणारं ते मुल माझं नाही.
कायद्यानुसार हे लग्न नाही, तर एक लिव्ह-इन रिलेशनशिप…
तर दुसरीकडे, नुसरत म्हणाली की तिचं निखिलसोबत लग्न तुर्कीमध्ये झालं हे लग्न भारतीय कायद्यानुसार मान्य नाही. ती पुढे म्हणाली की आमचा आंतरधर्मीय विवाह आहे आणि ते विशेष विवाह कायद्यांतर्गत भारतात नोंदवावं लागतं. कायद्यानुसार हे लग्न नाही, ते एक रिलेशनशिप किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होती.