मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या भेटीला, गोळीबार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन!

रविवारी, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला, त्यानंतर खान कुटुंब आणि सुपरस्टारचे मित्र, सहकारी आणि चाहते चिंतेत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानची भेट घेतली आणि सुरक्षेचे आश्वासन दिले.

  रविवारी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेलं गोळीबार प्रकरणाने (Salman Khan House Firing Case) संपुर्ण मनोरंजन सृष्टी हादरली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तपास करत दोन आरोपींनी गुजरातमधून अटक केली असून सध्या त्या आरोपींना 14 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर फॅन्ससह सेलेब्रिटिही सलमान विषयी चिंता व्यक्त करताना दिसले. नुकतचं राज ठाकरेंनी सलमान खानची भेट घेतली यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलमान खानची घरी जाऊन भेट (Eknath Shinde Meet Salman Khan) घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि सलमान खान समोरासमोर बसलेले दिसत आहेत. फोटोत सलमान खानचे वडील सलीम खान हे देखील एकनाथ शिंदेसोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. सलमानच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पाहायला मिळतात.

  एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला कडेकोट सुरक्षेचे आश्वासन दिले

  14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच सुपरस्टारचा फोटो समोर आला आहे. या फोटोत तो मुख्यमंत्र्यासोबत बोलताना दिसत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपरस्टार सलमान खानला कडेकोट सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. तसेच गोळीबारात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही सांगितले.

  काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  सलमानची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मी सलमानला काळजी करू नका, असे सांगितले आहे. सरकार त्याच्या पाठीशी आहे. मी पोलिस आयुक्तांना सलमान खान आणि त्याच्या नातेवाईकांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. पोलिस कडक कारवाई करतील.” ते करेल, जेणेकरून कोणीही ते पुन्हा करण्याची हिंमत करू शकणार नाही.” या भेटीत सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्याशिवाय काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, जीशान सिद्दीकी आणि युवासेना नेते राहुल नारायण कनाल हेही उपस्थित होते.

  गोळीबार प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची कोठडी

  रविवारी , 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घरावर दुचाकीवर आलेल्या आरोपींनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन्ही आरोपी गोळीबार करून पळताना दिसले. दरम्यान पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींचा मागोवा घेत त्यांना गुजरातच्य भुज येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता मुंबई गुन्हे शाखेने आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 25 एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. आत पोलीस त्यांनी कसुन चौकशी करणार आहेत.