एकता कपूर प्रतिष्ठित इंटरनॅशनल डायरेक्टरेट अवॉर्डने सन्मानित,तर वीर दासला विनोदी मालिका श्रेणीत पुरस्कार!

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये कला आणि मनोरंजन उद्योगातील जगभरातील तारे 14 विविध श्रेणींसाठी नामांकन करण्यात आले होते.

    प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स (Emmy Award) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान सोहळ्यांमध्ये गणला जातो. न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार भारताला मिळाले आहेत. टिव्ही निर्माती एकता कपूरला प्रतिष्ठित इंटरनॅशनल डायरेक्टरेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तर कॅामेडियन वीर दासला विनोदी मालिका श्रेणीत त्याचा शो ‘वीर दास: लँडिंग’साठी पुरस्कार देण्यात आला आहे.

    एकता कपूरने रचला इतिहास

    26 सप्टेंबर रोजी 51 व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्ससाठी नामांकने जाहीर करण्यात आली होती. विविध श्रेणींमध्ये नामांकन जाहीर करण्यात आली होती. या सोहळ्यात प्रसिद्ध निर्माती आणि चित्रपट निर्माती एकता कपूरला कला आणि मनोरंजनाच्या जगात तिच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.  हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहेत. तर वीर दासला कॉमेडी मालिका प्रकारात आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शोमध्ये, OTT प्लॅटफॉर्मच्या दोन मालिकांना आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. सर्वोत्कृष्ट मालिका मानल्या गेलेल्या शेफाली शाहच्या ‘दिल्ली क्राइम 2’ आणि जिम सरभ (रॉकेट बॉईज) ला नामाकंन मिळालं होतं. मात्र, या दोघांच्याही हातून हा पुरस्कार निसटला आहे.

    वीर दासला मिळाला एमी अवॉर्ड

    आपल्या हटके विनोदी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वीर दाससाठीला हा प्रतिष्ठित एमी अवॉर्ड्स देण्यात आला आहे. विर दासला हा पुरस्कार त्याच्या स्टॅन्ड अप कॅामेडी सिरीज विर दास लॅडींग साठी मिळाला आहे. त्याची ही सीरिज Netflix वर पाहु शकतो, ज्यामध्ये त्याने भारतात जन्मलेल्या आणि अमेरिकेत वाढलेल्या व्यक्तीचे राजकीय दृष्टीकोनातून भारतीय-अमेरिकन संस्कृतीच्याबद्दल विचार मांडले आहे.  या सिरीजचं दिग्दर्शन वीर दासने केलं आहे.