कोटा पोलिसांनी एल्विश यादवला अटक का केली नाही?

एल्विश विरोधात FIR असताना त्याला लगेच का सोडले याबाबात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता याबाबत कोटा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    एल्विश यादव : गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 3 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केली. एल्विशवर ड्रग्ज तस्करी आणि रेव्ह पार्ट्यांचा आरोप आहेत. त्यानंतर तो फरार असल्याचे सांगितले जात होते. आता एल्विशला शनिवारी राजस्थानच्या कोटा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, थोड्या वेळातच त्याला सोडण्यात आले. एल्विश विरोधात FIR असताना त्याला लगेच का सोडले याबाबात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता याबाबत कोटा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    कोटामध्ये एल्विश यादवला ताब्यात घेतल्याबाबत डीएसपी कैलाश चंद्र म्हणाले – “राजस्थान विधानसभा निवडणुकीमुळे नाकाबंदी दरम्यान नेहमीप्रमाणे तपासणी केली जात होती. यादरम्यान एक पंजाब क्रमांकाचे वाहन आले, ज्या गाडीत तीन-चार जण होते. यावेळी तपास केला असता त्यातील एकाने त्याचे नाव एल्विश यादव असल्याचे सांगितले. एल्विशच्या प्रकरणी नोएडामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आम्हाला होती. त्यामुळे जेव्हा आम्ही नोएडामधील संबंधित पोलिस स्टेशनच्या डीसीपी आणि एसीपीशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की एल्विश यादव हा वॉन्टेड नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याला अटक केली नाही.”

    सध्या राजस्थान पोलिसांसोबत उभा असलेला एल्विशचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एल्विशच्या चाहत्यांनीही त्याचे फोटो शेयर करत त्याला पाठिंबा दिला आहे. नोएडामध्ये युट्यूबर एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पाच लोकांना या प्रकरणात अटक केली आहे. याप्रकरणी व्हिडिओ शेयर करत एल्विशने या आरोपांचे खंडण केले होते. ‘माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे निराधार आहेत, सर्व खोटे आहेत. यात एक टक्काही तथ्य नाही. मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे.’असं त्याने व्हिडिओ शेयर करत सांगितले होते. आता या प्रकरणाचा तपास सुरु आहे.