खरतर ‘त्या’ घटनेनंतर इमरान हाशमीने किसिंग सीन न करण्याचा आणि बायकोला चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला!

तर झालं असं, इमरान एकदा बायकोला खुश करण्यासाठी आपला चित्रपट दाखवायला घेऊन गेला होता. मात्र या चित्रपटात इमरानचा एक किसिंग सीन आला. हा सीन पाहून थिएटरमधील प्रेक्षक जोरजोरानं त्याची स्तुती करत होते.

  इमरान हाशमी याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाल्यानंतर, सीरिअल किसर अशी ओळख निर्माण झाली. पण आता तो एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. रोमँटिक पासून ॲक्शन हिरोपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्याच्या किसिंग सीनची स्तुती केली जाते. मात्र अशा प्रकारची प्रशंसा इमरानच्या पत्नीला बिलकूल आवडत नाही. किंबहूना त्यानं इतर अभिनेत्रींना किस करणं हे देखील तिला आवडत नाही. तिनं किसिंग सीन पाहून रागाच्या भरात इमरानला रक्तबंबाळ केलं होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

   

  तर झालं असं, इमरान एकदा बायकोला खुश करण्यासाठी आपला चित्रपट दाखवायला घेऊन गेला होता. मात्र या चित्रपटात इमरानचा एक किसिंग सीन आला. हा सीन पाहून थिएटरमधील प्रेक्षक जोरजोरानं त्याची स्तुती करत होते. अर्थात त्यांचा ही स्तुती परवीनला मात्र आवडली नाही. तिनं इमरानच्या हातावर नखं मारुन आपला राग व्यक्त केला. तिनं रागाच्या भरात इतक्या जोरदारपणे मारल की त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर परवीन थिएटरमधून निघून गेली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

  हा किस्सा इमराननं कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितला होता. तेव्हापासून इमरानं चित्रपटात किसिंग सीन करणं कमी केलं. शिवाय स्वत:चे चित्रपट तो आपल्या बायकोला दाखवत नाही.