सत्यघटनेवर आधारीत ‘देवमाणूस’ मालिकेचा ‘असा’ होणार शेवट….

‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन १३ वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं.

  ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली ही मर्डर मिस्ट्री आता लवकरच उलगडणार आहे. कारण ‘देवमाणूस’ येत्या २१ मार्चला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. परंतु या मालिकेचा शेवट कसा होणार? डॉक्टरला पोलीस कसे पकडणार? ही उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  काही फॅनमेड स्टोरीनुसार पोलिसांना डॉक्टरांच्या हालचाली संशयास्पद वाटतात. त्यामुळं ते डिंपलला ताब्यात घेतात. डिंपल पोलिसांनी प्रचंड घाबरते अन् ती डॉक्टरांचं सत्य पोलिसांना सांगते. दुसरीकडे डॉक्टर मात्र मुंबईत पळून जातो. मात्र डिंपलमुळं त्याला पुन्हा एकदा गावात परतावं लागतं. अखेर साध्या वेशात त्याची वाट पाहात असलेले पोलीस त्याला पकडतात. अन् तुरुंगात डांबून त्याची चांगलीच धुलाई करतात. अखेर डॉक्टर केलेले सर्व गुन्हे कबूल करतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  ‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन १३ वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.