Laal-Singh-Chaddha

२०२० हे वर्ष मनोरंजनासाठी फारसं चांगलं नव्हतं. कोरोनाच्या काळात चित्रपटगृहही लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रपटगृहदेखील बंद झाली आहेत. ज्यामुळे चित्रपट व्यवसायावरही त्याचापरिणाम झालाय. लॉकडाऊनमुळे बऱ्याच चित्रपटाची चित्रीकरणं बंद झाली आहेत. त्यामुळे आता आशा आहे नवीन वर्षाकडून. २०२१ या नवीन वर्षात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. नव्या वर्षात बॉलिवूडचे अनेक बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत

२०२० हे वर्ष मनोरंजनासाठी फारसं चांगलं नव्हतं. कोरोनाच्या काळात चित्रपटगृहही लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रपटगृहदेखील बंद झाली आहेत. ज्यामुळे चित्रपट व्यवसायावरही त्याचापरिणाम झालाय. लॉकडाऊनमुळे बऱ्याच चित्रपटाची चित्रीकरणं बंद झाली आहेत. त्यामुळे आता आशा आहे नवीन वर्षाकडून.  २०२१ या नवीन वर्षात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. नव्या वर्षात बॉलिवूडचे अनेक बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत

१.

आरआरआर

‘बाहुबली’च्या यशानंतर एस. एस. राजामौली ‘आरआरआर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा दाखवली जाणार आहे. यात जुनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

२. ८३

कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित ‘83’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून १९८३ च्या विश्वचषक सामन्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत. या चित्रपटात रणवीर सोबत दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. तर आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे मराठमोळे अभिनेतेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

३.

बच्चन पांडे

दरवर्षीप्रमाणे अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. २०२१ मध्ये अक्षय अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘बच्चन पांडे’. ‘बच्चन पांडे’मध्ये अभिनेत्री कृती सेनॉन अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

radhe

 

४. राधे

सलमान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वांटेड भाई’ हा चित्रपट २०२० ला ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊ शकले नाही. आता हा चित्रपट २०२१ च्या ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सलमानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवांनी केलं आहे.

५.

लालसिंग चड्ढा

आमिर खान आणि करिना कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक असणार आहे. ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित होईल. करिना कपूरने नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

६.

बधाई दो

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा ए

कदा एकत्र काम करणार आहेत. हे दोघेही ‘बधाई हो’ चित्रपटाची फ्रेंचायझी ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहेत. ‘बधाई दो’ हा एक विनोदी चित्रपट आहे.

७.

बॉबी बिस्वास

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘बॉबी बिस्वास’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ या चित्रपटातील एका पात्रावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हटके लूकमध्ये दिसणार आहे.