
सोमीनं तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सलमान खानं तिच्या शोवर भारतात बंदी केली आहे. असा आरोप तिने केला आहे.
बॉलिवूडमध्ये (Bollywood) 90 च्या दशकात काम करणाऱी अभिनेत्री सोमा अली (Somy Ali) गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. तिने एक थ्रोबॅक फोटो शेयर करत सलमान खानवर (Salman Khan) अनेक गंभीर आरोप केले होते. आता सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सलमान खान इतरांशी चांगलं वागत असेल तर, याचा अर्थ तो सगळ्यांशीच चांगलं वागत असेल असं नाही. असं तिने म्हणत त्याला जाहीर माफी मागावी असं म्हण्टलयं.
सोमी अलीचे सलमानवर काय आरोप
सोमीनं तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सलमान खानं तिच्या शोवर भारतात बंदी केली आहे. असा आरोप तिने केला आहे. डिस्कव्हरी इंडियाचा शो फ्लाईट ऑर फाईट इन शोचं स्क्रीनिंग भारतात थांबवण्याचा प्रयत्न सलमाननं केल्याच तिने म्हण्टलयं. सोमाने म्हण्टलंय की, “काही वेळा पीडितेला तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराविषयी बोलण्यासाठी अनेक वर्षे लागतात. सलमान खान इतरांशी चांगलं वागत असेल तर, याचा अर्थ तो सगळ्यांशीच चांगलं वागत असेल असं नाही. सगळे लोक आतून ‘काळे’ असतात. असं ती म्हणाली.
माफी मागण्याची केली मागणी
सोमी अली म्हणाली की, “मला वाटतं की, मिस्टर खान यांनी स्वतःला आरशात पहावं आणि स्वतःला एक प्रश्न विचारावा… तू कधीच माझ्यावर हात उगारला नाही आणि मला कधीच शिवीगाळ केली नाही? हे तु कसं नाकारु शकतो. हे सर्व माहीत असूनही तू कसा आरामात जगू शकतोस आणि नंतर या गोष्टी नाकारू शकतोस? नंतर माझ्या शोवर बंदी घालण्याचं धाडस करू शकतोस? लाज वाटली पाहिजे. मला आशा आहे की, एक दिवस तुझ्यात हिम्मत येईल आणि तू जगासमोर माझी माफी मागशील आणि माझ्यासोबत जे काही केलंस ते मान्य करशील.”
सलमान खान आणि सोमी अलीने दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सोमीने तिच्या जुन्या मुलाखतीत सलमान खानसोबतच्या ब्रेकअपचे कारणही सांगितले होते. सलमानने आपली फसवणूक केल्याचे त्याने म्हटले होते, त्यामुळे त्याने सलमानला सोडले. त्यानंतर ती अमेरिकेला शिफ्ट झाली.