मराठी कलाविश्वाला मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आपल्या अभिनयानं त्यानी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

  मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेत प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) याचं हृदय विकाराचा झटक्याने निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

  मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आपल्या अभिनयानं त्यानी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी सिनेसृष्टीत मानानं आणि अभिमानानं मिरवावं असं व्यक्तीमत्व. त्याचं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

  मोरुच्या मावशीने पोहेचले होते घराघरात

  मोरूची मावशी १९६३ मध्ये भरभरून यश मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन आणि विजय चव्हाण हे नाटक पुन्हा घेऊन आले. विजय चव्हाण यांची मावशी तुफान हिट ठरली. हे नाटक प्रचंड चाललं होतं. मावशी म्हणजे विजय चव्हाण हेच समीकरण होतं. त्यांचा टांग टिंग टिंगा या गाण्यावरचा डान्स तर सतत प्रेक्षकांना लोटपोट हसवत राहिला. त्यातली प्रदीप पटवर्धन यांची भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे.

  प्रदीप पटवर्धन यांचे काही गाजलेले सिनेमे

  ‘एक फुल चार हाप’, ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोध’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बोरीज’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘थँक यू विठ्ठला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली.