धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची तिच्याच मुलाने केली हत्या, मृतदेह फेकला जंगलात

अभिनेत्री नीलू कोहलीने (Nilu Kohli) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

    मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) यांची हत्या करण्यात आली आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. धक्कादायक म्हणजे त्यांच्या मुलानेच संपत्तीसाठी त्यांचा खून केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुलगा आरोपी सचिन कपूर (वय, 43) अटक केली आहे.

    अभिनेत्री नीलू कोहलीने (Nilu Kohli) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. वीणा कपूर यांच्या मुलाने त्यांची बॅटने मारहाण करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह एका बॉक्समध्ये भरून माथेरानच्या (Matheran) जंगलात फेकून दिला. संपत्तीवरून वीणा कपूर आणि त्यांच्या मुलामध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटीं रुपयांच्या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे.
    नीलू कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”तु्म्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. तुमच्या निधनाने मला प्रचंड वाईट वाटत आहे. मी निशब्द आहे. पण आता एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्हाला अखेर शांतता मिळाली आहे. जुहू परिसरातील एका बंगल्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे”.