kashiram chinchay

लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन (Kashiram Chinchay Passed Away) झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

    मुंबई : कोळीगीत (Koligeet) लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन (Kashiram Chinchay Death) झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पारंपारिक कोळी गाण्यांचा बादशाह (Koligeet Badshah Passed Away) म्हटले जायचे.

    गेल्या काही दिवसांपासून काशीराम चिंचय हे आजारी होते. सुरुवातीला त्यांच्यावर अंधेरी पश्चिम या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचार घेत असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    डोल डोलतंय वाऱ्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी यासारख्या अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते. मी हाय कोळी, सन आयलाय गो या गीतांचेही तेच गीतकार आहेत.

    विजय कठीण आणि काशीराम चिंचय हे दोघे सोबत गाणी बनवायचे. त्यांच्या सर्व कॅसेट ‘वेसावकर आणि मंडळी’ या नावाने व्हीनस कंपनीने प्रसिद्ध केल्या होत्या. या वेसावकर मंडळींनी मानाची प्लॅटिनम डिस्कही मिळवली होती. कोळी, आगरी पारंपरिक गाण्यांचा ठेका त्यांनी सातासमुद्रापार नेला.