प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानने नोकराला केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच मागितली माफी!

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानने त्याच्या घरातील नोकराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

    पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानचा (Rahat Fateh ALi Khan)एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो घरातील नोकराला चप्पलने मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये राहत त्याला बाटलीबद्दल विचारत आहे आणि नोकर स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहतने माफीही मागितली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोक त्यावर कमेंट करत आहेत.

    व्हायरल व्हिडिओ मध्ये काय?

    सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान एका नोकराला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ते खूप रागाने नोकराला विचारताना दिसत आहेत – माझी बाटली कुठे आहे. तर नोकर म्हणतो मला माहित नाही कोणती बाटली, तर राहत म्हणतो जी सोबत पडली होती ती कुठे आहे. नोकर म्हणतो ती कुठे आहे मला माहीत नाही, ती एकचं आणली होती. मग राहत त्याच्या नोकराला सतत चापट मारतात. त्याचे केस पकडून त्याला ओढताच आणि जमिनीवरही आपटतात. मग त्याला धक्काबुक्की करताच. या दरम्यान काही लोक मदतीला येतात.

    फतेह अली खानने मागितली माफी

    गायक राहत फतेह अली खानने नोकराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्या नंतर नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत. यानंतर राहत फतेह अली खानचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका नोकरसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राहत आपल्या नोकराची माफी मागताना दिसत आहे.