shahid kapoor

सेलेब्रेटींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला चाहत्यांना फार आवडतं. सोशल मीडियामुळे आता सेलेब्रेटी आणि चाहते यांच्यातील अंतरही कमी झालय. त्यामुळे चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रेटीला सर्रास प्रश्न विचारताना दिसतात. इन्स्टाग्राम यांसारख्या विविध अॅप्सच्या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांचे दररोजचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. मात्र एका प्रश्नाने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं.

View this post on Instagram

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

एका चाहत्याने मीराला ती पुन्हा गरोदर आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर तिने “नाही” म्हणत हसण्याचा इमोजी पोस्ट केला. फिल्म इंडस्ट्रीतही येण्याचा विचार आहे का असा प्रश्न दुसऱ्या चाहत्याने विचारला असता मीराने त्यालासुद्धा ‘नाही’ असंच उत्तर दिलं. याचसोबत तिने बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचंही स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मीरा २०१८ मध्ये एका जाहिरातीत झळकली होती. ती सोशल मीडियावरही अनेक प्रॉडक्ट्सची जाहिरात करताना दिसते. मीराचं २०१५मध्ये शाहीद कपूरशी लग्न झालं. या दोघांना चार वर्षांची मुलगी मिशा आणि दोन वर्षांचा मुलगा झैन आहे. शाहिद आणि मीरामध्ये १३ वर्षांचं अंतर आहे.