फेमिना मिस इंडिया 2022 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली रुबल शेखावतचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश

'फेमिना मिस इंडिया 2022' मध्ये दुसरे स्थान पटकावलेली रुबल शेखावत 'इपिला' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

    ‘फेमिना मिस इंडिया 2022’ मध्ये दुसरे स्थान पटकावलेली रुबल शेखावत ‘इपिला’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा तेलुगू भाषेतील चित्रपट प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता रवी तेजा यांचा पुतण्या माधव भूपती राजू यांचाही डेब्यू चित्रपट असेल. रुबल शेखावतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना ही माहिती दिली आहे.

    या पोस्टरवर लोक तिचे अभिनंदन करत आहेत. बुज्जी गुरू या चित्रपटाची निर्मिती करत असून लुधीर बायरेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.