काही तासातच होणार ‘फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अशी त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एरियल अॅक्शन चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

    ‘फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर होणार प्रदर्शित : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा आगामी एरियल अॅक्शन चित्रपट फायटरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्र;आताची चर्चा प्रचंड सुरु आहे आणि काही दिवसाआधीच हृतिक रोशनचा फायटर चित्रपटामधील पहिला लुक समोर आला होता. या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी दोन्ही स्टार्सच्या पात्रांचे अनावरण केले आहे. आता हा चित्रपटाच्या टीझरची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

    नुकताच टीझरचा एक अनाउंसमेंट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की हा टीझर ८ डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता रिलीज होणार आहे. या घोषणेनंतर चाहते खूपच उत्साहित दिसत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अशी त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या एरियल अॅक्शन चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थचा हृतिकसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘वॉर’, ‘बँग बँग’मध्ये एकत्र काम केले आहे. फायटर हा हृतिक रोशनचा पहिला 3D चित्रपट आहे, ज्याबद्दल तो खूप उत्सुक आहे.

    फायटर हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हृतिक आणि दीपिकाची भूमिका सशक्त आहेत आणि पोस्टरमध्ये हृतिक आणि दीपिकाचा हा लूक पाहून चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. आपणास सांगूया की या चित्रपटात दीपिका स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे, जिचे पाळीव प्राणी मिनी आहे. दरम्यान, हृतिक स्क्वाड्रन पायलट ‘शमशेर पठानिया’ उर्फ ​​’पॅटी’च्या भूमिकेत दिसणार आहे.