फायटरचं पहिलं गाणं रिलीज, दीपिका पादुकोण-हृतिक रोशनची कमाल केमिस्ट्री; तुम्हीही थिरकल्याशिवाय राहणार नाही!

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या फायटर या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. धमाकेदार टीझरनंतर चित्रपटाचं पहिलं गाणं 'शेर खुल गए' रिलीज झालं असून, ते सध्या चर्चेत आहे.

  अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika padukone) फायटर (Fighter ) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून त्याल प्रेक्षकांची पंसती मिळाली आहे. टीझरनंतर आता चित्रपटाचं ‘शेर खुल गए’ (Sher Khul Gaye)हे पहिलं गाणं रिलीज झालं असून हे गाणंही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलं आहे.

  हृतिक-दीपिकाची कमाल केमेस्ट्री

  फायटर चित्रपटातील ‘शेर खुल गए’ या गाण्यात हृतिक रोशन,दीपिका पादुकोण, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय देखील आहेत. या गाण्याचं आकर्षण म्हणजे हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची केमेस्ट्री. डान्स फ्लोअरवर दोघही जबरदस्त मूव्ह करताना दिसत आहे.  या गाण्याला पाहून बँग बँग चित्रपटाच्या टायटल ट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्या गाण्यातील  हृतिक आणि कतरिनाच्या डान्सस्टेप्सने सुद्धा प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं होतं. आता फायटर चित्रपटातील  या गाण्यातील  खास डान्सस्टेप्सही फॅन्सना वेड लावतीलच आणि या गाण्याच्या चाली पाहता ते रीलवर व्हायरल होईल असं वाटतंय. अभिनेता अनिल कपुरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं  शेअर केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by anilskapoor (@anilskapoor)

  हे गाणं बॉस्को-सीझर या जोडीनं कोरिओग्राफ केलं आहे. हे गाणं चित्रपटातील एखाद्या कार्यक्रमादरम्यान किंवा पार्टीदरम्यान दिसतं असून आहे जिथे टीम काहीतरी सेलिब्रेशन करत आहे. गाण्याच्या शेवटी व्हिडिओमध्ये अनिल कपूरही दिसत आहे. या गाण्याला विशाल-शेखर, बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी आवाज दिला आहे. विशाल-शेखर या जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले असून कुमार यांनी गीते लिहिली आहेत.

  चित्रपट कधी रिलीज होणार?

  फायटरच्या टिझरला मिळालेला प्रतिसाद पाहता फॅन्समध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.  हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यामध्ये जबरदस्त हवाई अ‍ॅक्शन दिसत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लूकचीही बरीच चर्चा झाली असून आता चित्रपटातील पहिल्या वहिल्या गाण्यानंही प्रेक्षकांच मन जिकलं आहे.