vikas sawant

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला (Vikas Sawant) मोठी संधी मिळाली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट व मराठीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांनी विकासला चित्रपटाची ऑफर दिली आहे.

    ‘बिग बॉस मराठी’च्या (‌Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वामध्ये छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकास सावंतने (Vikas Sawant) घरात एन्ट्री घेताच सदस्यांसह प्रेक्षकांचेही डोळे उंचावले होते. घरात हळुहळू रुळत गेल्यावर विकासने अक्षरश: कल्ला केला होता. टास्कमध्ये त्याची शक्ती व आक्रमकता पाहून सदस्यही भारावून गेले होते.‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या विकास सावंतचा बिग बॉसच्या घरातला प्रवास गेल्या आठवड्यात संपुष्टात आला. त्यामुळे खेळ सोडत विकासला घरातून बाहेर पडावे लागले.

    ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकासने मुलाखत दिली.विकास सावतंने या मुलाखतीत घरातील सदस्य व खेळाबाबत अनेक खुलासे केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला मोठी संधी मिळाली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट व मराठीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विकासला चित्रपटाची ऑफर दिली आहे. याचा खुलासा मुलाखतीत विकासने केला.“महेश मांजरेकर सरांकडून मला चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. मी खरंच खूप खूश आहे. माझ्या भविष्यकाळातील प्रोजेक्टसाठी मी उत्सुक आहे. कोरिओग्राफर होण्याचं स्वप्नही मला पूर्ण करायचं आहे. बिग बॉसने मला सर्व काही दिलं आहे. यासाठी मी त्यांचा आभारी आहे”, असं विकास म्हणाला.

    विकासची ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंबरोबर घट्ट मैत्री जुळली होती. अनेकदा त्यांचे खटकेही उडाले. मात्र तरीही त्यांच्यातील मैत्री कायम होती. विकास घरातून बाहेर पडताना किरण माने भावूक झाले होते. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी किरण मानेंनीच जिंकावी अशी इच्छा असल्याचं विकास घरातून बाहेर आल्यानंतर म्हणाला होता.