
फिल्म फेअर’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा पुरस्कार पटकावणे हे प्रत्येक बॉलिवूड कलाकारचे स्वप्न असते.
नुकताच ६६व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२१ची घोषणा झाली. यामध्ये बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खानला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. चाला जाणून घेऊया फिल्म फेअर पुरस्कारातील विजेत्यांची यादी…
सर्वोत्कृष्ट चित्रपट- थप्पड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ओम राऊत (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- इरफान खान (अंग्रेजी मिडीयम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तापसी पन्नू (थप्पड)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- फराह खान (दिल बेचारा)
सर्वोत्कृष्ट ड्रेस डिझायनर- विरा कपूर (गुलाबो सिताबो)
सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला- आलाया फर्निचरवाला (जवानी जानेमन)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- राजेश कृष्णन (लूटकेस)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सैफ अली खान (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- फारुख जाफर (गुलाबो सीताबो)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायिका- असीस कौर (मलंग)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक- राघव चैतन्य (थप्पड)
सर्वोत्कृष्ट संगीत – प्रतिम (लुडो)
समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ऐब आले ऊ
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (गुलाबो सीताबो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तिलोटामा शोम (सर)
विशेष पुरस्कार
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- इरफान खान
आरडी बर्मन पुरस्कार- गुलजार